मुंबई : सध्याला राज्यभरात बांगलादेशी घुसखोरींबाबतीत जोरदार धरपकड सुरू आहे. अशातच भाजपा नेते किरीट सोमैय्या आणि मंत्री नितेश राणे यांनी या प्रकरणावर जोर दिला आहे. घाटकोपर पोलिसांनी मोठी कारवाई करत १२ बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. मुंबई पोलिसांच्या झोन सातच्या विशेष पथकाने पथक प्रमुख रेवणसिद्ध ठेंगळे यांच्या नेतृत्वात वर्सोवा येथील खोजा गल्ली परिसरात ही कारवाई केली. विशेष म्हणजे अटक केलेल्या १२ पैकी १० जण हे एकाच कुटुंबातील आहेत. गेले २० वर्षे हे सर्व घुसखोरी करून भारतात राहत होते.
अटक करण्यात आलेल्या संशयितांमध्ये रोहिमा शहाबुद्दीन खान (४९), शकील कादर शेख (३०), रूखसाना शकील शेख (३५), वहीदुल फैजल खान (४१), जस्मिन वहीदुल खान (३८), सिमरन वहीदुल खान (२०), हसन अब्दुल रशीद खान (६५), आणि अब्दुल आजीज (५५) यांचा समावेश आहे. यात चार महिला, चार पुरुष आणि चार लहान मुलं आहेत.
?? हे देखील वाचा : “महाकुंभ स्नानानंतर अयोध्येत दर्शनासाठी भक्तांची वाढली गर्दी”
या बांगलादेशी नागरिकांकडून पोलिसांनी भारतीय बनावट ओळखपत्रे जप्त केली आहेत, ज्यामध्ये पासपोर्ट, आधार कार्ड, इलेक्शन आयडी, पॅन कार्ड आणि रेशनकार्ड यांचा समावेश आहे. यापूर्वीच विशेष पथकाने १३ बांगलादेशी घुसखोरांना अटक केली होती, त्यानंतर ही दुसरी मोठी कारवाई करण्यात आली आहे.
घाटकोपर पोलीस यांनी १२ बांगलादेशी यांची केली अटक १)रोहिमा शहाबुद्दीन खान ४९ वर्ष
२) शकील कादर शेख ३० वर्ष
३) रूखसाना शकील शेख ३५ वर्ष
५) वहीदुल फैजल खान ४१ वर्ष
६) जस्मिन वहीदुल खान ३८ वर्ष
७) सिमरन वहीदुल खान २० वर्ष
८) हसन अब्दुल रशीद खान ६५ वर्ष
९) अब्दुल आजीज ५५ वर्ष pic.twitter.com/IcBTTUk7Dq — Kirit Somaiya (@KiritSomaiya) January 29, 2025
?? हे देखील वाचा : अटल सेतूला प्रवाशांचा प्रतिसाद नाही?
Ghatkopar police arrested 12 Bangladeshi 1 Rohima Shahabuddin 49 year
2 Shakeel Sheikh 30
3 Rukhsana Sheikh 35
4 Wahidul Faizal 41
5 Jasmin Wahidul Khan 38
6 Simran Wahidul Khan
7 Hasan Abdul Rashid 65
8 Abdul Aziz 55 28 Bangladeshi arrested in ChiragNagar Ghatkopar this month pic.twitter.com/faVNsCGk1Z — Kirit Somaiya (@KiritSomaiya) January 29, 2025